॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर

गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया

Profile Yashwant97
आता लवकरच गटारी येईल.या गटारीची पार्टी करू असा मित्रांचा फोन आल्यावर वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया बघा ..... मेष.. ..यांचा धडक बाणा हे बघ बंडूचा फोन होता.आम्ही गटारी पार्टी करतोय.अडवण्याचा प्रयत्न करू नको... बायको ....वृश्चिकेची चंडिका ... मी कशाला अडवू?पण गटारात तोंड बुडवून आल्यावर अंघोळ करा म्हणजे झालं वृषभ......अग बंडूचा फोन होता गटारी पार्टी आहे जाऊ ना? कन्येची पत्नी.......म्हणजे तिथे सग्गळं होणार ना पिणं वगैरे.. ... पति(वैतागून)हो आम्ही सगळे हाॅर्लिक्स पिणार आहोत मिथून.....अग बंडूचा फोन.... मिथूनेचीच पत्नी....गटारी पार्टी ना?? खुशाल जा.पण उतरल्याशिवाय घरी येऊ नका कर्क......अग त्या बंड्याने फोन करून बोलावलेयनाही म्हणणे ठीक नाही.काय करू? पत्नि.....कर्केचीच.....नाईलाज आहे.पण जा पण तुम्ही पिऊ नका सिंह. ..हे बघ बंडूचा फोन आलाय आणि आम्ही पार्टी करणार आहोत पत्नी.....वृश्चिकेची...जा की मग दारू ढोसा वाट्टेल ते करा.पण तरंगत घरी आल्यावर मी दार उघडणार नाही  कन्या.... अगं बंडूकडे आम्ही पार्टी करतोय. मिथुनेची चतुरा पत्नी....जा जा एक दिवस मजा करा (असे तोंडाने म्हणताना नव-याची गाडीची किल्ली हळूच काढून घेते. कुंभ.....गटारीला बंडूकडे मदिरा प्राशनाचा कार्यक्रम आहे पत्नी....कुंभेचीच.....खुशाल जा या क्षणभंगूर जीवनातले असे आनंदाचे क्षण चुकवू नका मीन.....अग ए गटारीला बंडूकडे पार्टी आहे जाऊ ना वृषभेची पत्नी.....जा तर.पण परत येताना आपल्याच घरात या गेल्या वेळेस किरकिरे काकूंच्या घराची बेल वाजवून गोंधळ उडवला होतात तूळ... बंडूकडे गटारी पार्टी आहे.मला बोलावलेय मेषेची पत्नी... जा पण येताना भान ठेवा.गेल्यावर्षी बंडूभावजींचा लेंगा घालून घरी आलात बावळटासारखे वृश्चिक......हे बघ बंडूकडे पार्टीला चाललोय वेडपटासारखी सारखा फोन करू नको तुळेची पत्नी....बरं तूम्हीच उतरल्यावर फोन करा धनू......मूड नव्हता माझा पण ड्रींक्स पार्टीला नाही कसं म्हणणार सिंहेची पत्नी ....काहीही करा तुम्हाला घाणीत तोंड बुडवायचेच असेल तर मी काय करणार?? मकर.......बंडू अतिशय दुःखी आहे म्हणून आम्ही जमतोय मिथुनेची पत्नी....ढोसून दुःख हलकं करून झालं की या घरी मग पूजा करते तुमची!! ⌚2 months ago

Profile Prathmesh
🤣🤣🤣🍾
⌚2 months ago
गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया
🟢 Online (11) 🟢